श्री सिताराम महाराज विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर

0

 श्री सिताराम महाराज विद्यालयाचा कबड्डीत दुहेरी मुकुट

 तालुकास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश


पंढरपूर प्रतिनिधी:-  मातोश्री गुरुकुल, पखालपूर (गुरसाळे), ता. पंढरपूर येथे दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पंढरपूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत खर्डी येथील श्री सिताराम महाराज विद्यालयाने दुहेरी यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांचा तसेच मुलींचा संघ तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विजेता ठरला.

१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात श्री सिताराम महाराज विद्यालय, खर्डी विरुद्ध राहुल गांधी विद्यालय, कोर्टी यांच्यात सामना झाला. या अटीतटीच्या लढतीत खर्डीच्या संघाने बाजी मारत विजेतेपद मिळवले.

मुलांच्या संघाला आण्णासो घाडगे सर, आप्पा रोंगे सर, भारत पाटील सर, सिताराम रोंगे व अमोल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

मुलींच्या संघाचीही विजयी कामगिरी

१७ वर्षांखालील मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात श्री सिताराम महाराज विद्यालयाच्या मुलींनी श्री अण्णासाहेब पाटील विद्यालय, तिसंगी या संघावर मात करत विजेतेपद मिळवले.

मुलींच्या संघाला आण्णासो घाडगे सर, आनंदा रोंगे सर, बबीता बाबर मॅडम व कल्पना मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

या दुहेरी यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. लवटे सर व पर्यवेक्षक चव्हाण सर यांनी सर्व विजयी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री सिताराम महाराज विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल श्री सिताराम महाराज विद्यालय संस्था, शिक्षकवृंद, पालक तसेच खर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)