पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूरचे वतीने जागतिक महिला दिन साजरा

0



पंढरपूर (प्रतिनिधी) दिनांक 18 - महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती शाखा पंढरपूर व कुमार प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्शा सौ. साधनाताई भोसले, मनसेच्या सौ. माधुरी दिलीप धोत्रे, डॉक्टर सौ. वर्षा काणे, सौ स्मिता गणेश अधटराव, लोटस स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर जयश्री भोसले, सौ. विनया संकेत कुलकर्णी व सौ. रसिका कुमार वाघमोडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभ हस्ते  दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की - पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम अहोरात्र करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सुरक्षा समितीच्या वतीने घेण्यात येत आहे. समाजामध्ये होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्याचे काम पत्रकार सुरक्षा समिती मार्फत केले जाते असेही ते म्हणाले.

 महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आदर्श माता म्हणून - मंगलताई शहा, आदर्श शिक्षिका म्हणून - सुनिता धनंजय मोहोळकर, उत्कृष्ट खेळाडू - ज्योती बनसोडे, समाजभूषण - सौ दुर्गा माने, प्रसिद्ध अधिवक्ता - एडवोकेट पूनम अभंगराव, कला भूषण - कुमारी मैना काळे, कर्तुत्ववान महिला म्हणून रणरागिनी पुरस्कार - संगीता थोरात-सोळंकी, दामिनी पुरस्कार - कुसुम क्षीरसागर ( पोलीस), उत्कृष्ट कर्मचारी - लक्ष्मी वायदंडे, सफाई कर्मचारी - लता विश्वनाथ काळुंगे, सामाजिक कामात योगदान दिल्यामुळे डॉक्टर अंजली महेश बडवे यांचा शाल,  गुलाबपुष्प, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 याप्रसंगी सौ विनया संकेत कुलकर्णी, माजी नगराध्यक्शा सौ. साधनाताई भोसले आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  बोलताना डॉक्टर सौ. वर्षा काणे म्हणाल्या - समाजाचे काहीतरी देणे लागते या नात्याने पत्रकारांनी महिला भगिनींचा यथोचित  सन्मान सोहळा संपन्न करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून माझा सन्मान केला व समाजातील सर्व स्तरातील विशेष कर्तुत्ववान  महिलांचा सन्मान करून पत्रकारांनी एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला.

      याप्रसंगी पत्रकार बांधवांच्या सौभाग्यवतींचा यथोचित सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी शेवडे यांनी केले. आभार प्रदर्शन रसिका वाघमोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रामचंद्र सरवदे, रवींद्र शेवडे, रामकृष्ण बिडकर, लखन साळुंखे,  नागेश काळे, दत्ताजीराव पाटील, विश्वास पाटील, राहुल रणदिवे, कुमार वाघमोडे  व पत्रकार सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)