थकीत मालमत्ता धारकांवर जप्तीची कार्यवाही करणार – मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव

0

  


पंढरपूर  नगरपरिषदेची कर वसुलीसाठी धडक मोहिम ***** २० थकीत मालमत्ता धारकांचे नळकनेक्शन तोडले . पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील थकित मालमत्ता धारकांना करांची रक्कम भरणेबाबत वारंवार  लेखी मागणी बील व  नोटीसद्वारे  व स्पिकरद्वारे सुचना देवुन सुद्धा व जप्ती पुर्व नोटीस दिल्यानंतरही त्यांनी कराची रक्कम न भरल्याने  त्याच्या नावाची यादी  वृत्तपत्रात प्रसिध्द  करण्यात येईल अशा सूचना दिल्या होत्या व सदर मालमत्ता धारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील २० नळ कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली .


पंढरपूर शहरामध्ये एकूण २१८२९  मालमत्ता धारक व ५००० झोपडपट्टी धारक आहेत.  ३१मार्च अखेर पाणीपट्टीसह  एकूण मागणी रू२५,५३,७६,७०२/- आहे त्यापैकी २० मार्च ०२५ अखेर १३,१२,६३,०३२/- इतका वसूल झाला आहे व  ३१ मार्च ०२५ अखेर १२,४१,१३,६७०/- येणे बाकी आहे सद्या वसुलीची टक्केवारी पाहता ५२ टक्के वसूल झाला आहे
    सदर वसुलीसाठी नगरपरिषदेतील २५ कर्मचा-यांची ४ विशेष वसुली-जप्ती पथकाद्वारे कर वसुलीलाठी धडक मोहिमे राबविण्यात येत आहे. कर वसुलीची मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने शहरातील ५० हजाराच्या वर थकबाकी असणा-या २००० मालमत्ता धारकांची थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असुन या थकबाकीदारांना पुरेशी व वाजवी संधी देवुनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्याने अशा मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल अशा सूचनाही दिल्या  व स्पिकरद्वारेही त्यांच्या घरासमोर थकबाकीची रक्कम भरावी म्हणुन नावे पुकारण्यात आली आहेत तसेच महाराष्ट्र नगरपलिका अधिनियम १९६५ मधील कलम १५२ मधील तरतुदीनुसार  थकबाकी दारांना जप्तीची कारवाई करण्याची नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. तदनंतरही सदर मालमत्ता धारकाने थकबाकीची रक्कम न भरल्याने आज नगरपरिषदेने सुरु केलेल्या कर वसुली धडक मोहिमेमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागातील एकूण २० मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
 तसेच ज्या मालमत्ताधारकांची १० हजाराच्या पुढे थकबाकी आहे अशाही मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असुन त्याच्या मालमत्तेची जप्ती करण्यात येणार आहे मालमत्ता जप्त केल्यानंतरही मालमत्ता धारकांने रक्कम न भरल्यास  शासन निर्देशानुसार व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १५६ मधील तरतुदीनुसार मा.जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने सदर मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याची तरतुद करण्यात आल्याने अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांवर याप्रमाणे कारवाई करण्याची संकेत मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व  कर अधिकारी सुप्रिया शिंदे  यांनी दिले आहेत. सदरची विशेष धडक मोहिम प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी सुप्रिया शिंदे, भांडार व खरेदी पर्यवेक्षक विजय शहाणे, सहाय्यक कर निरीक्षक अंजली काबुगडे,वॉरंट लिपिक संभाजी देवकर , प्रशासकीय अधिकारी श्री रवींद्र सूर्यवंशी, सहाय्यक कार्यालय अधीक्षक  सुवर्णा हाके या पथक प्रमुखांच्या समवेत ८ वसुली लिपिक व चार शिपाई सहित जप्तीच्या कारवाईसाठी ४पथके व ४ वाहने कार्यरत असल्याची माहिती कर अधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)