पंढरपूर शहरात पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक

0


पंढरपूर - पंढरपूर शहराला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. पुन्हा एकदा अवैध वाळूतून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घडत आहे. दोन दिवसापूर्वी पंढरपूर शहरांमध्ये अंबाबाई पटांगणात नव्या पुलाजवळ या इसमाने दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. ही घटना पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २० फेब्रुवारी रोजी रात्री अंबाबाई पटांगण येथील नव्या पुलाच्या गाळा नंबर ३ येथे लखन ननवरे याने गावठी पिस्तूल आणून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची परिसरात चर्चा होत आहे. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. शहर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी गराडा घालून संबंधित आरोपी ननवरे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायदा नुसार १९५९ कलम तीन प्रमाणे व महाराष्ट्र राज्य शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याकामी जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रीतम यावलकर, डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशन निरीक्षक विश्वजीत घोडके व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला अटक केली. यामध्ये सपोनि आशिष कांबळे व कॉन्स्टेबल शरद कदम, सुरेश हॅचाडे, राजेंद्र गोसावी, बजरंग माळी यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)