राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" अंतर्गत विद्यार्थ्यांची विशेष तपासणी मोहीम

0



आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर येथे मोहिमेचे उद्घा टन

  पंढरपूर : राज्य शासनाने संपूर्ण राज्यात " राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम" अंतर्गत विद्यार्थ्यांची विशेष तपासणी मोहीम या योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार सदरच्या मोहिमेचा शुभारंभ संपूर्ण राज्यात दि. ०१ मार्च रोजी इंदिरा गांधी मॉडेल स्कूल औंध, पुणे येथून उपमुख्यमंत्री  अजित पवार ,  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  मंत्री. प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता मोहिमेच्या उद्घाटनापासून झाला . या उद्घाटन कार्यक्रमास प्रत्येक जिल्ह्यातील एक शाळा व तालुकास्तरीय एक शाळा दुरभाष्य प्रणालीद्वारे या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित झाले होते.

सदर मोहिमेचा उद्घाटन कार्यक्रम  आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आमदार अभिजीत पाटील,आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले .

      या प्रसंगी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश कुमार सुडके., डॉ एकनाथ बोधले तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. चारुदत्त शितोळे  आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती घंटी मॅडम , तालुक्यातील अशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श प्राथमिक विद्यालय शिक्षकवृंद व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ.  कुलदीप डोके, डॉ. धनंजय सरोदे, डॉ. आबा गायकवाड, डॉ.किरण वहिल यांनी केले.

 या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाची व्याप्ती व उद्दिष्ट या बद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश कुमार सुडके    यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी डॉ. राहुल सावंत यांनी सूत्र संचालन केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअधिकारी डॉ. संभाजी भोसले  यांनी आभार मानले.

या प्रसंगी अंगणवाडी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य करण्यात आली. असल्याचे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)