मंदिर समितीकडून सामान्य तुळशीपुजा भाविक व व्हीआयपी तुळशीपुजा भाविकांमध्ये भेदभाव

0

सामान्य भाविकांची तुळशीपुजा सभामंडपात पण व्हीआयपी राजकीय नेत्यांची पुजा थेट विठ्ठलाच्या चरणावर ** सामान्य भाविक 2100 रूपयांची पावती फाडतात पण राजकीय नेते फुकट पुजा करून जातात ** सामान्य भाविकाला पेढे तर व्हीव्हीआयपीला काजू, बदाम,पिस्ते सुका मेवा

पंढरपूर-पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरात मंदिर प्रशासनाकडून सामान्य भाविक व व्हीआयपी भाविकांच्या तुळशीपुजेत मोठा भेदभाव केला जात आहे. सामान्य भाविकांना 2100 रूपयांची पावती फाडल्यानंतर केवळ 5 व्यक्तींसह  सभामंडपात तुळशीअर्चन मंत्रोक्त पुजा केली जाते तर व्हीआयपी राजकीय नेत्यांना कोणतीही फी न आकारता फुकटात थेट श्री विठ्ठलाच्या चरणावर तुळशी अर्चन पुजा केली जाते यामुळे सामान्य भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
याबाबत काही भाविकांनी माझ्याकडे स्वत: तक्रार केल्या आहेत. उदा. मराठवाडा वारकरी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब मोहिते पाटील परभणी यांनी मंदिर समितीकडे याबाबत तक्रार केली आहे. तरी सभामंडपातील पुजा बंद करून थेट विठ्ठलाच्या समोर व्हीआयपीप्रमाणेच सामान्य भाविकांची देखील पायावर 108 तुळशी वाहून हार घालून त्यांच्यावतीने पेढे दाखवून त्यांना नारळ प्रसाद मिळावा व व्हीआयपीप्रमाणे सामान्य तुळशी पुजा करणाऱ्या भाविकांचा देखील मंदिर समितीच्या कार्यालयात उपरणे घालून फोटो देवून सत्कार करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे निष्ठावंत दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी मंदिरे समितीकडे केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)