दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री शक्तीला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या उद्देशाने व चार भिंतीमध्ये कायमस्वरूपी आपल्या स्वतःला बंदिस्त करून घेणाऱ्या या स्त्रीला नवरात्राच्या महोत्सवाच्या निमित्ताने तिला या दांडियाच्या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा व तिला व्यक्त होण्याचे हे दांडिया महोत्सव एक कारण आहे. असे अनिल दादा सावंत आपल्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना म्हणाले.
या दांडिया उत्सव 2024 या कार्यक्रमाचे अंतर्गत विजेती संघाला 18 भव्य आकर्षक बक्षिसे ही दिली जाणार आहे. याची माहिती देखील आज रोजी त्यांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित एन आय टी चे अध्यक्ष श्याम गोगाव सर संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर साहेब आधी कार्यक्रमास उपस्थित होते.



