पंढरपूर - पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक झाली. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. इथल्या नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हातानं मैला उचलण्याचं काम केलं आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीनं सोडवण्यात याव्यात. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्ती देण्यात यावी. त्यासंदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्रं तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना बैठकीत संबंधितांना केल्या.
नगरपरिषदेतील ३६२ पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरं उपलब्ध करुन देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा. नागरी हिवताप प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदं पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागानं करावी. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या १६ पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे. तथापि प्रलंबित ६६ वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रं उपलब्ध होऊ शकली नसल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. या ६६ वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचं आयोजन करुन वारसांकडील कागदपत्रं आणि नगरपालिकेकडील कागदपत्रं तपासण्यात यावीत, असे निर्देश दिले



