दर्शन रांगेचा स्कायवॉकला निधी मिळविण्यात खा.प्रणिती शिंदे यांचा सिंहाचा वाटा - दत्तात्रय बडवे शिंदे

0



जिल्हाधिकारी व मंदिर समिती यांचे आभार ** परंतू दर्शन रांगेतील बॅरेगेटींगच्या 1 कोटी रूपयांच्या कामाची चौकशी करा ** बॅरेगेटींग चुकीच्या पध्दतीने केल्याने त्यातून माणूस सहज जातो आत त्याची तात्काळ दुरूस्ती करा ** म्हणूनच शेवटच्या माणसाला पदस्पर्श दर्शनाला लागतात 36 ते 40 तास ** कार्तिकी वारीच्या आधी बॅरेगेटींगमधून भाविक न जाण्यासाठी तात्काळ बॅरेगेटींगची दुरूस्ती करा

पंढरपूर-  श्री विठ्ठल मंदिर पूर्वी बडवे यांच्या ताब्यात होते त्यावेळेस भाविक पददर्शन श्री विठ्ठलाचे पददर्शन रांग जथा (गु्रपने) पध्दतीने घेत होते त्यावेळेस मंदिर बडवे यांच्या ताब्यात असल्यामुळे शासनाने त्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले त्यामुळे दर्शन रांगेत गर्दीमुळे लहान मुले, वृध्द पुरूष महिला यांची चेंगराचेंगरी होवू लागली त्यामध्ये अनेक भाविक जखमी झाले परंतू त्याची दखल शासनाने घेतली नाही तद्‌नंतर 2014 पासून श्री विठ्ठल मंदिर शासनाकडे आल्यानंतर त्यांनी पददर्शन रांगेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली त्यामुळे दर्शन बारी ते कुंभार घाट शासनाच्या निधीतून दर्शन पुल तयार करण्यात आला. पुढे ती लाईन गोपाळपूरच्या पुढे गेली त्यावेळेस मंदिर समितीने कुंभार घाट ते स्मशानभूमी पत्राशेड ते गोपाळपूरपर्यंत बॅरेगेटींग चुकीच्या पध्दतीने बसविले त्या बॅरेगेटींगच्या दोन सळईच्या मधील अंतरामधून भाविकांची दर्शन रांगेत घुसखोरी असते त्यामुळे दर्शनरांगेतील शेवटच्या माणसाला दर्शनाला 36 ते 40 तास लागू लागले आम्ही सतत मागणी करीत होतो की अनेक निवेदने दिली त्यामुळे बॅरेगेटींगच्या कामाची चौकशी करण्यात यावी. विशेष म्हणजे बॅरेगेटींग बनविताना त्याचे ड्रॉईंग का बनविले नाही चुकीचे काम झाले आहे. तसेच टोकन पध्दतीऐवजी पददर्शन स्कायवॉक तयार करण्यात यावा अशी मागणी केली त्यातच सोलापूरच्या कॉंग्रेसच्या तरूण तडफदार खासदार प्रणिती शिंदे निवडून आल्या.

आषाढी वारी नियोजनाच्या बैठकीवेळेस त्यांनी मंदिर समितीच्या सहअध्यक्षांकडून भाविकांना दर्शन रांगेत त्रास होवू नये म्हणून याबाबत माहिती घेतली व ह.भ.प.गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी हे होणे गरजेचे असल्याचे सांगितले व आपण शासन दरबारी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सांगितले त्यानंतर नुतन खासदार प्रणिती शिंदे यांनी आषाढी एकादशीदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून ही बाब निदर्शनास आणली.त्यावेळेस जिल्हाधिकारी, सहअध्यक्ष उपस्थित होते यानंतर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले व 129 कोटी पैकी 110 रूपयांच्या निधी देण्यास मान्यता दिली आहे. सदरच्या दर्शन रांगेतील स्कायवॉकमुळे दर्शन रांगेतील घुसखोरी थांबणार आहे.

 माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या घराण्याचे मंदिर समितीकडून भाविकांना सोयी सुविधेवर ते स्वत: मुख्यमंत्री होते तेव्हापासून लक्ष आहे त्यांनी मंदिर समिती कर्मचाऱ्यांना 5 वा वेतन मंजूर केला होता तसेच प्रणिती शिंदे या आमदार होत्या त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये मंदिर समितीच्या योजना तात्काळ मंजूर करत असत त्याच धर्तीवर पददर्शन स्कायवॉक मंजूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे भाविक व वारकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे तसेसच जिल्हाधिकारी व मंदिर समितीचे आभार मानतो अशी माहिती सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे शिंदे यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)