पंढरपूर ( प्रतिनिधी) बदलापूर या ठिकाणी घडलेली अमानुष घटना, बदलापूर येथील आदर्श नावा च्या शाळेमधील कर्मचाऱ्यांनी तीन वर्षी मुलीच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना या घटनेच्या बाबत सखोल चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावी. अशी मागणी करणारी बातमी बदलापूर येथील महिला पत्रकारांनी लावली असता बदलापूर येथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी सदर महिलेला अश्लील व अर्वाच्य भाषा वापरून त्या महिला पत्रकाराची मानहानी केल्याची घटना बदलापूर येथे घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले गेले आहे. बदलापूर येथील वामन म्हात्रे या माजी नगराध्यक्षावर कडक कारवाई करण्याची मागणी शहर व तालुक्यातील पत्रकारांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.
शाळेमध्ये अशी अमानवीय लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेची बातमी बदलापूर येथील महिला पत्रकारांनी लावली. तेव्हा या महिला पत्रकारला माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे त्या महिलेला "जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय की काय?” अशा आवेशात तू बातमी लावली आहेस" असे अर्वाच्य भाषा वापरून सदर महिलेचा एक प्रकारे विनयभंग केलेला आहे. अशा विकृत वृत्तीच्या माजी नगराध्यक्ष वर कडक कारवाई केली जावी.या महिला पत्रकारास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा एक प्रकारे त्या महिला पत्रकाराचा विनयभंग चा आहे. अशा या विकृत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर दमदाटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पंढरपूर शहर व पंढरपूर तालुक्यातील पत्रकारांनी आज निवेदनाद्वारे केली.
यावेळी पंढरपूर शहरातील व पंढरपूर तालुक्यातील पत्रकार नवनाथ पोरे , हरिभाऊ प्रक्षाळे, रामभाऊ सरवदे, विकास पवार,महालिंग दुधाळे, विनोद पोतदार ,बाहुबली जैन , राजेश फडे , दिनेश खंडेलवाल , वीरेंद्र उत्पात , नागेश आदापुरे, शिवाजी शिंदे, नितीन शिंदे यापत्रकारां सह पंढरपूर शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.


