वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी सभासदासाठी आर्थिक उन्नती साधण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. चेअरमन कल्याणराव काळे

0


पंढरपूर --प्रतिनिधी  चेअरमन कल्याणराव काळे याने गोपाळपूर मुंडेवाडी , चळे ,आंबे सरकोली, शिरगाव, राजनी ,आंबे   आधी गावांमध्ये घोंगडी बैठक व गाव भेट दौऱ्याप्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे यांनी पाटील यांच्या आरोपात प्रतिउत्तर म्हणून साजेल असे दमदार भाषण शेतकरी सभासद यांच्या गाव भेटीदरम्यान केले.   तसेच विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी वैयक्तिक गाटी भेटी वर जोर दिला आहे.

   या गाठीभेटी दरम्यान बैठकीतून स्वर्गीय वसंतराव दादा काळे यांनी पुढील दूरदृष्टी ठेवून तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी बांधावर पडत होता म्हणून अहो रात्र परिश्रम घेऊन सभासदांना आपला ऊस व्यवस्थित गाळप करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी भाळवणीच्या माळरानावर चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली स्वर्गीय दादांच्या नंतर मी स्वतःकारखाना व्यवस्थित चालवत असल्यामुळे सतत काही ना काही अडथळे निर्माण करून काही विघ्न संतोषी लोकांना मोठी स्वप्ने पडू लागल्याने आपल्यातीलच काही बगलबच्चन कारखाना सुव्यवस्थेत चाललेला पाहवत नसल्याने स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी काही ना काही आरोप करीत आहेत, ही प्रवृत्ती रोखण्यासाठी इथला सभासद जागृत आहे . त्यासाठी कार्यकर्त्याने दक्ष राहावे असे आवाहन कल्याणराव काळे स्वतः सभासदांपर्यंत जाऊन करत आहेत , वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, उभारणीसाठी १४ वर्षे आपल्या हयात घालवली. वीस वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांसाठी सभासदासाठी आर्थिक उन्नती साधण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले. 

 दादांच्या संस्था आम्ही जीव ओतून चालवत असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले यावेळी  मारुती भोसले शहाजी साळुंखे, अण्णासाहेब शिंदे हनुमंत दांडगे दादासाहेब ढोले धनाजी चौगुले बिभीषण आनपट, राजाराम गायकवाड ,संतोष भोसले ,पांडुरंग भोसले, भास्कर भोसले ,आनंदा भोसले , आदी सहकार शिरोमणी  परिवारातील सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)