नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते गुरुजी यांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार

0

 


 

जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2 जून रोजी- नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते गुरुजी यांना केला जाणार प्रदान- धर्मभास्कर प. पू. सद्गुरुदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती 

छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणे च्या वतीने दिला जाणारा ४० वा " जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार" यंदा सुविख्यात नामदेवगाथाव्रती प्रकाश निकते गुरुजी (पंढरपूर) यांना प्रदान केला जाणार आहे. हा सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री शिवराज्याभिषेक शक ३५० शुक्रवार दि. २ जून २०२३ रोजी  श्रीशनेश्वर धाम मंगल कार्यालय सांगोला रोड, पंढरपूर येथे ठीक १०.३० वाजता  पासून सुरु होईल. अध्यक्षस्थान प. पू. आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (बीड) भूषवितील तर  विशेष अतिथी म्हणून धर्मभास्कर प. पू. सद्गुरुदास महाराज, (पूर्वाश्रमीचे सुप्रसिध्द शिवकथाकार श्री विजयराव देशमुख) उपस्थित राहणार आहेत. 

यंदाच्या पुरस्काराचे मानकरी नामदेवगाथाव्रती  पंढरपूरचे  प्रकाश निकते गुरुजी हे गत ५ दशकांपासून  ज्ञानभक्त संत नामदेव साहित्याचा प्रचार करण्याचे कार्य करतात.  नामदेव गाथासंशोधन करून त्यांनी  ग्रंथ सिद्ध केला आहे. पत्राद्वारे श्री नामदेव गाथा अभ्यास सुरु करुन हजारो अभ्यासकांना नामदेवगाथाव्रती बनविण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांनी नामदेव गाथेची देशभरात सामुदायिक पारायणे केली.'संत नामदेव अभंग चिंतनिका' नामदेव महाराजांचे विविध विषयांवरचे ३९९ अभंग निवडून दैनंदिन चिंतनिका देखील त्यांनी प्रसिध्द केलीआहे. यापूर्वी पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात त्यांचा जाहीर सत्कार झालेला आहे.या सोहोळयात उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती सेवा प्रतिष्ठान नागपूर-पुणे चे अध्यक्ष अजय देशमुख; सचिव भालचंद्र देशकर  व विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)