ऑक्सिजन मेनअभिजीत पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार

0
 


 पंढरीत होणार विठ्ठल च्या सभासद आणि कामगारांचे ,व्यापारांचे होणार मोठे शक्ती प्रदर्शन
पंढरपूर --पंढरपूर तालुक्यातील हजारो लोकांचा संसार चालविणाऱ्या श्री विठ्ठल सह साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शेकडो अर्ज विक्री झाले आहेत. यामध्ये बुधवार पर्यंत 230 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. गुरुवार दि ९ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. या दिवशीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. अशातच तालुक्याचे लक्ष लागून असलेले उद्योगपती आणि चेअरमन अभिजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज  गुरुवारी दाखल करण्याचा मुहूर्त शोधला आहे. हा उमेदवारी अर्ज सभासद आणि कामगार तसेच व्यापारी यांच्यासह मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात  येणार आहे.
    आपण चार साखर कारखान्याचे चेअरमन असलो तरी आपण सभासद असणारा कारखाना नेटकेपणाने चालविला पाहिजे ही मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन मागील अनेक महिन्यापासून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी कारखान्यातील सभासद आणि कामगार यांनी मोठं पाठबळ उभे केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. 
  यामुळे या सभासदाचे नेमके पाठबळ किती आहे, हे गुरुवारी दिसून येणार आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी९वाजता हे मोठे शक्तिप्रदर्शन प्रांत कार्यालयकडे जाऊन अभिजीत पाटील यांच्यासह त्यांच्या पॅनलच्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
 पंढरपूर तालुक्यातील विविध भागात आपला जंगी प्रचार मोठया सभेच्या माध्यमातून केला गेला आहे. याच निवडणुकीतील महत्वपूर्ण टप्पा असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट होणार आहे. यानंतर उमेदवारी अर्ज छाननी होऊन पुढील राजकारण ढवळून निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)