पंढरपूर(प्रतिनिधी)उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी अनेक वर्षांच्या परंपरेनुसार श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या मूर्तीस दरवर्षी चंदन उटी पूजा करण्यात येते. यासाठी भाविकांकडून शुल्क आकारणी केली जाते, श्री विठ्ठल चंदन उटी पूजेसाठी २२लाख,सत्तेचाळीस हजार रुपये तर श्री रुक्मिणी माता उटीपूजेतून सुमारे पाच लाख ८५हजार असे एकूण २८लाख,बत्तीस हजार रुपये उत्पन्न श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस प्राप्त झाले आहेत.चैत्र शुद्ध१ ते मृग नक्षत्रापर्यंत दुपारी पोशाखानंतर ४:३०ते ५:३०या वेळेत चंदन उटीपूजा करण्यात येते. दि२एप्रिल पासून सुरू करण्यात आलेली या पूजा बुधवार दि८जून रोजी समाप्ती करण्यात आली. व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, यांनी सपत्नीक चंदन उटीपूजा सांगता केली,यावेळी मंदिर समिती सदस्या ,नगरसेविका शकुंतला नडगिरे,ऍड माधवी निगडे,कर्मचारी उपस्थित होते.२०२०आणि२०२१या दोन्ही वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने चंदन उटीपूजा होऊ शकली नव्हती,श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात१०७तर श्री रुक्मिणी मातेकडे ६५अशा एकूण १७२भाविकांच्या हस्ते पूजा संपन्न झाल्या.

