जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करा ग्राहक कल्याण फाउंडेशन ची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

0


सोलापूर (प्रतिनिधी ) रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानादेखील सोलापूर शहरातील नवीन विडी घरकुल जुना विडी घरकुल  त्याचबरोबर कामती कुरुल मोहोळ तालुका पंढरपूर तालुका मंगळवेढा तालुका तसेच इतर तालुक्यात बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे रुग्णावर उपचार करीत असून या बोगस डॉक्टर मुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे चुकीच्या उपचारांमुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून बोगस डॉक्टर कारवाईचे पाऊल उचलले जात नाही तालुक्यातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने थातून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत असून गोरगरिबांना तज्ञ डॉक्टरांची फी परवडत नसल्याने व बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात  डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांना देखील समजत नाही तसेच रुग्न देखील डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रता विषयी चौकशी करत नाहीत  जिल्हा आरोग्य विभागाकडून सोलापूर शहर व जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई  होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यात बोगस डॉक्टर यांची संख्या मोठी असून ती आरोग्य प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे बोगस डॉक्टर मुक्त सोलापूर शहर व जिल्हा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)