पंढरपूर (प्रतिनिधी ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली आहे . त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह मानाच्या दहा पालखी सोहळे गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन मंडळाच्या बसने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला येतील.
असे असतानाही अनेक वारकरी हे पंढरपूर मध्ये दाखल होत असताना दिसत आहे. त्या दृष्टीने पावले उचलत पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने पंढरपूर मध्ये साधारण 5 ते 6 ठिकाणी कोरोना चाचणी करणारी पथके तैनात केली असून बाहेरगावाहून पंढरपूर मध्ये येणार्या भाविकांची कोरोना चाचणी करून मगचं त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश देण्यात येत आहे. आत्तापर्यत 1500 लोकांच्या टेस्ट घेण्यात आल्या असून. सरासरी 500 लोकांमध्ये 1 ते 2 किंवा रूग्न आढळून आले आहेत. दि.17 जुलै पर्यंत या टेस्ट घेण्यात येणार आहेत.जर एखाद्या भाविकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. तर त्याला रूग्नवाहिकेच्या मदतीने त्वरीत 65 एकर किंवा गजानन महाराज मठा मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.



