१० जुलै पासून राज्यभर पावसाचे वातावरण निर्माण होणार

0

काही दिवस बेपत्ता झालेला पाऊस आता पुन्हा परतला असून राज्यात येत्या दोन दिवसांत पाऊस जोर धरणार असून १० जुलै पासून राज्यभर पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

  जून महिन्याच्या प्रारंभापासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला पण नंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतेत होते. पेरणीचंही संकट उभं राहिलं होतं पण आता पावसाने वर्दी दिलेली असून येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असून यामुळे गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल अशी शक्यता आहे.पुढच्या दोन दिवसांत पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या १० जुलैपासून राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण दिसू शकतं.आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर १० जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  सोलापूर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळमध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)