तात्यासाहेब वासकर दिंडीने मात्र पोलिसांना गुंगारा देत, अवघ्या 7 दिवसात ही दिंडी पंढरीत दाखल

1

पंढरपूर (प्रतिनिधी ) : कोरोनाचे महासंकट , पोलिस प्रशासनाची रस्त्यावर होणारी अडवणूक या सर्व गोष्टींचा गनिमी काव्याने सामना करीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची गुरुवर्य तात्यासाहेब वासकर दिंडी आज भूवैकुंठ पंढरीत दाखल झाली. आणि दिंडीने आपली पायी वारीची परंपरा कायम ठेवली. विशेष म्हणजे अवघ्या 7 दिवसात ही दिंडी पंढरीत दाखल झाली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली आहे . त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह मानाच्या दहा पालखी सोहळे गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन मंडळाच्या बसने आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला येतील.

शासनाने विवाह , निवडणुका , मेळावे , सभा , समारंभाप्रमाणे पायी वारीलाही परवानगी द्यावी अशी मागणी वारकर्‍यांनी केली होती वारकरी प्रतिनिधी व जेष्ठ कीर्तनकार ह भ प बंडातात्या कराडकर व पांडुरंग महाराज घुले यांनी याबाबत आग्रह धरला होता व आपल्या निवडक वारकर्‍यांसह त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानानंतर चालायला सुरुवातही केली, परंतु दिघीजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व कराड येथे पोलिसांच्या निगराणीखाली ठेवले. पोलिसांना हुलकावणी देत दादा महाराज शिरवळकर दिंडी आळंदीहून निघाली परंतु दिवे घाटात त्या दिंडीला पोलिसांनी अडविले व अटक केली.

अटकसत्र सुरु असतानाच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची दिंडी म्हणून ओळख असलेल्या तात्यासाहेब वासकर दिंडीने मात्र पोलिसांना गुंगारा देत वारकरी सांप्रदायाची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत मजल दरमजल करीत पायी वारी पूर्ण केली. 

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा