संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकणार्‍या पंढरपूर मधील गावांना तहसिदारांची भेट

0

पंढरपूर : सध्या भिमा-निरा खोर्‍यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असून तब्बल 60 तासामध्ये उजनी धरन जवळपास 25 ते 30 टक्के भरले. पावसाचा वेग असाचा कायम राहिला व उजनी कडे येणार्‍या पाण्याची आवक अशीच रहिली तर मात्र उजनी चे दरवाजे उघडून पाणि सोडावे लागेल, यामुळे पंढरपूर व आसपास च्या खेड्यामध्ये पुरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

यासाठी तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकणार्‍या शिरढोण, कौढाळी, खेडभोसे,देवडे,पटवर्धन कुरोली, पिराची कुराली या गावांना भेट दिली. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवार्‍यासाठी सुरक्षित  असलेल्या शासकीय इमारती शाळा, मंदिर या ठिकाणी निवार्‍याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध ठेवावीत विद्युत पुरवठा सुरळित राहावा याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क रहावे असे आवाहन तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी गावकर्‍यांना केले 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)