भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील बेघर नागरिकांना अन्नदान - निलेश जाधव मित्र परिवाराचा अप्रतिम उपक्रम

0

 


पंढरपूर  - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकण क्षेत्रात महापूर अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचे थैमान चालु आहे.तसेच पावसाने अनेक भागत दरडी कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील जिवित हानीमुळे राज्याच्या भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी त्याचा वाढदिवस साजरा न करता नुकसानग्रस्तांना मदतीचे आवाहन सर्व कार्यकर्त्याना केले होते. 


    भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवसा निमित्त केलेल्या या आवाहनास प्रतिसाद देत निलेश जाधव मित्र परिवार, पंढरपूर यांच्यावतीने पंढरपुर शहरातील बेघर नागरिकांना अन्नदान करण्यात आले. 

याप्रसंगी अँड.ओंकार जोशी ,युवक नेते अक्षय वाडकर ,उमेश सर्वगोड, प्रशांत सर्वगोड ,रिपाईचे जेष्ठ नेते प्रविण माने यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)