पहा काय आचारसंहिता लागू झालीय सरकारी नोकरदार व कर्मचाऱ्यांना , ठाकरे सरकारचा झटका!

0


राज्य शासकीय कर्मचार्‍यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी निर्णय काढल्यावर गदारोळ करणार्‍या या कर्मचार्‍यांसाठी आता भ्रमणध्वनी (मोबाइल) वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

 आता अशा कर्मचार्‍यांनाही आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे. आता त्यावर सरकारी कर्मचार्‍यांच्या संघटना काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  प्रशासन सुमारे 1 लाख 20 हजार कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी आता भ्रमणध्वनी (मोबाईल ) आचारसंहिता लागू झालेली आहे.

हेआहेत प्रमुख मुद्दे

1) कार्यालयात शक्यतो लँडलाइनचा वापर करावा गरज भासली तरच मोबाईल   वापर मोबाइलवर सौजन्यपूर्वक बोलावे, वाद टाळावे

2) लघुसंदेशचा (टेक्स्ट मेसेज) वापर करावा लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ यांच्या आलेल्या दूरध्वनींना त्वरित उत्तरे द्यावीत

3) समाज माध्यमांचा वापर करत असताना वेळ आणि भाषा याचा तारतम्याने वापर करावा वैयक्तिक कॉल असतील तेव्हा कार्यालयाच्या बाहेर जाऊन घ्यावे

4) कार्यालयीन कामांसाठी कर्मचारी दौर्‍यावर असेल तर मात्र मोबाइल बंद ठेवता येणार नाही

5) वरिष्ठांच्या कक्षात मोबाईल  सायलेंट मोडवर ठेवावेत, बैठकीत किवा वरिष्ठांच्या कक्षात मेसेज पाहणे टाळा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)