
यानिमित्ताने दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले , महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक कंबरडे देखील मोडले आहे. अशातच माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत. तसेच आजपासून वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या माध्यमातून देखील मदत पाठवण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे.
शनिवारी सायंकाळी 1000 सोलापूरी चादरी घेऊन सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचती करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्राकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, ,सचिव अभिषेक रमपुरे, गोविंद बंदपट्टे,समर्थ ओझा, पवन दोरकर, अभिजित डूबल इत्यादी उपस्थित होते.


