उजनी सारख्या महाकाय प्रकल्पामध्ये 24 तासात पाणि साठ्यामध्ये तब्बल अकरा टक्के वाढ

0

 


पंढरपूर (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून भीमा खोर्‍यात होत असलेल्या मुसळधार मावसामुळे उजनी पाण्याची आवक शनिवार 24 जुलै रोजी सकाळी 57 हजार क्युसेक ईतकी होती.धरण चोवीस तासात जवळपास अकरा टक्के वधारले आहे. सकाळी सह वाजता ते 12.79 टक्के उपयुक्त स्थितीत होते.

नीरा नदी परिसरात होत असलेल्या पावसाने रात्री वीरचे दरवाजे उघडून 4 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर काल सायंकाळपासून वीज निर्मिती साठी 800 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पहाटे हा विसर्ग 29 हजार क्युसेक करण्यात आल्याने आता नीरा व भीमा नदी भरून वाहणार आहेत.

हा महाकाय प्रकल्प 24 तासात अकरा टक्के वधारला आहे. दोंडमधून येणारी पाण्याची आवक व पुणे बंडगार्डन विसर्ग पाहता उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारणार आहे. भीमा व नीरा खोर्‍यात मुसळधार पावसाची आजही नोंद असून अनेक धरण परिसरात तसेच भीमेच्या उपनद्यांच्या पर्जन्यक्षेत्रात दोनशे मिली मीटरहून अधिक पाऊस आहे दरम्यान खडकवासला धरणातूनही 20 हजार वसक ने पहाट पाणी सोडले जात होते. यामुळे उजनीत दैडजवळून येणार्‍या पाण्याचा विसर्ग हीं आता 57 हजार 754 क्युसेक असून

मागील चोवीस तासात भीमा खोर्‍यातील तसेच भीमा नदीच्या परिसरात होत असलेला पाऊस, इंद्रायणी नदीतून येणारे पाणी यामळे दैडचा विसर्ग वाढत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)