वीर धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पडणार्य मुसळधार पावसामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री 8 वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.. शनिवारी पहाटे 6 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.
वीर धरणाच्या विद्युत गृहातून रात्री 8 वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. रात्री 12:30 धरणाच्या सांडव्यातून वाजता 4,637 क्युसेक्स वेगाने, 2 वाजता विसर्गाचा वेग वाढवून 12,408 क्युसेक्स, तर पहाटे 6 वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.



