पंढरपूर : सध्या संपुर्ण देश हा कोरोना महामारीच्या दुसर्या लाटे ला लढा देत आहे. जवळजवळ संपुर्ण महाराष्ट्र हा लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणु चा संसर्ग हा पहिल्या लाटेला जेवढा घातक होता. किंबहुना त्याहुन अधिक घातक या दुसर्या लाटेत असल्याचे दिसुन येत आहे. अनेक लोकाचा मृत्यु हा या कोरोना संसर्ग होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे.
या विषाणु ला रोखण्याचा एकमेव पर्याय हो सोशल डिस्टसिग हा आहे. यामुळेच सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन तमिम सय्यद इनामदार जिल्हा सरचिटणीस भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सोलापूर यानी केले आहे. चंद्र दर्शनानुसार पंढरपुरासह सर्वत्र 14 तारखेला ईद साजरी करण्यात येण्याची शक्यता आहे. रोज्यामध्ये सुर्योदयापुर्वी खाणे(सहेरी)अपेक्षित आहे,तर सुर्योदयानंतर जेवण(इफ्तार) करण्याची परवानगी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले सर्व रोजे ईदच्या दिवशी सोडले जातात. दर वर्षी सगे सोयरे, मित्र परिवार, शेजार्यासमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे शासनाने दिलेले नियमांचे व सुचनांचे पालन करत तसेच आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून जेणेकरून या कोरोना संसर्गाचा ङ्गैलाव होणार नाही याची काळजी आपण सर्व मुस्लिम बांधवांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक भान राखत साधेपणाने ईद साजरी करावी. सर्वांच्या दिर्घायुष्यासाठी दुआ प्रार्थना करावी, असे आवाहन तमिम सय्यद इनामदार यानी केले आहे.
रमजान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच नमाज पठण करुन देशातील मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदच्या दिवशी करावे,असे आवाहन तमिम सय्यद इनामदार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.तमाम हिंदु मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.


