कोरोना च्या दुसर्या लाटेचा प्रभाव पाहता लसिकरणाला अधिक वेग देता यावा साठी राज्यशासन सर्वतोपरीने प्रयत्न करित आहे. लसिकरणाला अधिक वेग मिळण्यासाठी सर्व नागरिकाना आपल्या जवळच्या भागात लसिकरणाचा लाभ घेता यावा या दृष्टी ने टाकळी जि.प.शाळेमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या लसिकरण केंद्राचा फायदा लक्ष्मी टाकळी व उपनगरातील लोकांना होणार आहे. असे मत जि.प.सदस्य रामदास ढोणे यांनी बोलताना व्यक्त केले.
टाकळी जि.प.शाळेत लसिकरण केंद्राचे उद्घाटन जि.प सदस्य रामदास ढोणे यांच्या हस्ते नारळ ङ्गोडण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित ग्रा.पं सदस्य,अनिल सोनवणे, मा.सरपंच बापूसाहेब कदम,आबासाहेब पवार ,औदुंबर पोतदार, माऊली देशमुख, ग्रामसेवक खंडागळे, तलाठी शिंदे, आशा वर्कर, व ग्रामस्थ उपस्थित, होते.
लसिकरणाचा प्रारंभ जि.प.सदस्य रामदास ढोणे यांना प्रथम लस देऊन करण्यात आला. या लसिकरण केंद्राचा लाभ ल.टाकळी व उपनगरातील लोकांनी घ्यावा.गर्दी न करता लसिकरण करावे जेणे करून कोरोना चे संक्रमण लसिकरण केंद्रामध्ये होऊ नये. व लसिकरण करताना शासनाने घालुन दिलेले सर्व नियम पाळावे व आपल्या लसिकरणाची तारिख ऑनलाईन बुक करून दिलेल्या वेळेत लसिकरणास यावे असे मत ग्रा.पं.सदस्य मा.श्री.अनिल सोनावणे यांनी व्यक्त केले.



