लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखल्या जाणार्या प्रत्रकारांनी गेल्या अनेक दिवसापासून कोरोना महामारी मध्ये लोकामध्ये जनजागृती करणे तसेच झालेल्या सकारात्मक व नकारत्मक सर्व प्रकारच्या घडामोडी उजेडात आणण्याचे काम गेली कितेक वर्ष करित आहेत. पण या कोरोना महामारीमध्ये पत्रकारितेचे असणारे योगदान हे अतुलणिय आहे. गेली साधारण वर्ष ते सव्वा वर्ष झाली. पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करित आहेत. कोरोना विषाणू कसा आहे. त्याचे मुळे होणारे नुकसान किंवा या पासुन आपले संरक्षण कसे करायचे, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जनतेसाठी काय करत आहे ? किंवा काय करायला हवे. लोंकाचे हित कशात आहे. राज्यात कोठे अवैध प्रकार होत आहेत का ? जनतेची या महामारीत कोण फसवणूक करून लुबाडत तर नाही ना ? कोणत्या प्रकारे जनतेनी आपली काळजी घ्यावी. राज्यातच नव्हे, तर देशातच नव्हे तर जगात काय परिस्थिती आहे या विषाणु ची या सर्व बाबी प्रखरतेने मांडुन जनतेसमोर आणण्याचे कार्य पत्रकार करित आहेत. या मध्ये अनेक पत्रकार कोरोना संक्रमित झाले,दुदैवीकाही पत्रकार बांधवाचा मृत्यु ही झाला.
या सर्व गोष्टी चा विचार करून मा.श्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना साथीच्या रोगा दरम्यान सर्व पत्रकारांना फन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित करावी अशी मागणीचे पत्र मा.श्री.मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे यांना दिले. असून इतर राज्यानी पत्रकारांना फन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित केले आहे. तरी महाराष्ट्रानी ही पत्रकारांना फन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित करावे असे मुद्दे माडण्यांत आले आहे.
मा.श्री.दिलीप वळसे-पाटील यांनी ही माहिती व पत्र ट्विटर ला शेअर करून दिली.




