पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर मध्ये सध्या होत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी बाहेर न फिरता, सोशल डिस्टन्स पाळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसत आहेत, नागरिकांनी घरात बसुन कोरोना ची साखळी तोडावी म्हणून सध्या पंढरपूरात कडकलॉकडाऊन केले आहे. हे लक्षात घेऊन लिक्विड औषध वाटपाचा निर्णय मित्र परिवाराने घेतला.
कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये असे वाटत असेल तर आपली प्रतिकार शक्ति चांगली असणे महत्वाचे आहे. ज्या व्यक्ती ची प्रतिकार शक्ति चांगली आहे. अशा लोकांना कोरोना चा प्रादुर्भाव कमी होतोे किंवा होतही नाही. असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन चे म्हणणे आहे.
याचा विचार करुन मोरया ग्रुप 5000 व लाला पानकर भाऊ टमटम मित्र परीवार पंढरपूर यांच्या तर्फे प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी लिक्वीड स्वरूपातील औषधे व आयुर्वेदिक औषधाचे वाटप मा.श्री.उमेशरावजी परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.




