पंढरपूर (प्रतिनिधी) पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी पंढरपूर येथील रामचंद्र सरवदे यांची निवड करण्यात आली ही निवड पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या उपस्थितीत राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना सोलापूर यांच्या हस्ते रामचंद्र सरवदे यांना निवडीचे पत्र व पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखपत्र हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पंढरपूर येथील संत गाडगे महाराज मठ याठिकाणी आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे तसेच आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनीदेखील रामचंद्र सरवदे व पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती चे नुतन अध्यक्ष यशवंत कुंभार उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे खजिनदार श्रीनिवास उपळकर या नुतन पदाधिकारी चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर शहर उपाध्यक्ष बिपीन दीड्डी अक्षय बबलाद बाबा काशीद तसेच पंढरपुरातील पत्रकार सुरक्षा समिती चे राजेंद्र काळे विश्वास पाटील दत्ता पाटील राधेश बादले पाटील बाहुबली जैन अमर कांबळे राम कृष्ण बिडकर चैतन्य उत्पात कबीर देवकुळे रवी शेवडे प्रकाश सरताळे अधिक पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते

