पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेमध्ये परिचारक गटाच्या सनि मुजावर, कृष्णा वाघमारे, अंबादास धोत्रे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पंढरपूर नगरपालिकेमध्ये 3 स्विकृत जागा रिक्त झाल्या आहेत. अनेक जन या रिक्त जागावर नगरसेवक म्हणून येण्यास इच्छुक आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांची निरनिराळ्या पद्धतीने मोर्चेबांधनी चालु आहे. परंतु या जागेवर मा.श्री.तमिम इनामदार यांची निवड करावी अशी मागणी युवक वर्गातुन होत आहे.
मा.तमिम इनामदार हे सध्या भाजप अल्पसंख्याक मोर्चा जि.सरचिटणीस पदावर कार्यारत आहेत. तमिम इनामदार यांचा अनेक सामाजीक कार्यक्रमामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्यामुळे तसेच अनेक प्रसंगामध्ये त्यांची राजकीय समज या मुळे त्यांचे कार्यकर्ते व युवक वर्गातील त्यांचे चाहते यांच्या कडून मा.श्री.तमिम इनामदार यांना स्विकृत नगरसेवक पदाची संधी द्यावी अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

