भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकास दिला सबुरीने गाडी चालवायचा सल्ला ,आमदार परिचारक यांच्या गाडी समोर झाला होता अपघात

0
पंढरपूर- आमदार प्रशांत परिचारक यांच्या इनोवा कारला कट मारून भरधाव निघालेल्या कारने आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडी समोरच 3/4 पलट्या मारल्या, अचानक गाडी समोर पलटी झाली.. पण आमदार साहेबांचा ड्रायव्हर गोरे यांनी प्रसंगावधान राखून गाडी कंट्रोल करून थांबवली साधारण रात्रीचे 8 . 30 च्या सुमारास पंढरपूर हून कोर्टी कडे आमदार प्रशांत परिचारक जात असता त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून एक इनोवा कार एम एच 45 / 70 88 पुढे गेली व अचानक काही अंतरावरच तीन चार पलटी होऊन थांबली. यावेळेस आमदार साहेबांच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली व व त्यांनी गाडीतील प्रवाशांची चौकशी केली कोणाला काही झाले नाही याची खात्री करून आमदार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. गाडीतील कोणाला काही झाले नसल्यामुळे आमदार मार्गस्थ झाले. पण आमदार प्रशांत परिचारक यांना व गाडीला काही झाले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)