चार कारखाने असताना सर्व प्रथम युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी 50 बेडचे रूग्णालय उभारण्याचा घेतला निर्णय

0


मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात कोरोनारोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक रूग्नांना बेड व सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांची होत असलेली पिळवणूक, अचानक झालेल्या आजारपणामुळे रूग्नांची पळापळ व आर्थिक लुबाडणूक लक्षात घेता युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी साखर कारखान्यावर 50 बेडचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी भरतीबाबत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.
        साखर आयुक्तांनी प्रत्येक साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कोव्हिड सेंटर सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. तालुक्यात चार साखर कारखाने असताना सर्वप्रथम त्यासंदर्भातील हालचाली अधिक गतिमान केल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांबरोबरच कारखान्यातील कामगार व ऊसतोड मजुरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय सुविधा कारखान्यावर देण्यासाठी घेतलेला या निर्णयाने पंढरपूर मंगळवेढा येथील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)