आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड

0

पंढरपूर : दिवंगत चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवड प्रक्रिया संपन्न झाली.या मध्ये आमदार प्रशांत परिचारक यांची बिनविरोध निवड झाली.


     ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शेतकर्‍यांसाठी उभारलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदाची गुरुवारी सकाळी 11 वाजता निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी कारखान्याच्या सर्व संचालकांनी तसेच व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांनीच चेअरमन व्हावे. सुधाकरपंता नंतर कारखान्याची धुरा आ. प्रशांतराव यांनीच सांभाळावी. अशी भावनिक विनवणी केली. त्यानंतर निवड प्रक्रियेतील कायदेशीर बाबी पर्ण करून चेअरमन पदासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे निर्देशित
करण्यात आले. यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)