पंढरपूर येथे सुधाकरपंत परिचारक यांचा अस्थीकलश दर्शनासाठी...

0
पंढरपूर :-  पंढरपूर चे लाडके माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे काल 11.30 वाजता पुणे निधन झाले.  त्यांचेवर पुणे येथेच अंत्यसंस्कार  करण्यात आले. 
पंढरपूर शहर व  तालुक्यातील सर्व नागरीक,स्नेही यांना आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांचे पवित्र अस्थिकलश दर्शन करता यावे यासाठी उद्या सकाळी ११ वाजता त्यांचे निवासस्थानी (वाड्यात) रहाते घरी ११-३० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांना दर्शनाकरीता ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर महाद्वारघाट येथून चंद्रभागा नदीत त्यांच्या पवित्र अस्थींचे विर्सजन होईल.
ग्रामीण भागातील लोकांसाठी जिल्हापरिषद गट- कासेगाव, भाळवणी, खर्डी, देगाव, पुळूज, देगाव याठिकाणी व मंगळवेढा तालुक्यात युटोपियन साखर कारखाना येथे त्यांचे अस्थिकलश दर्शनाकरीता ११-३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहेत.
 सर्व अस्थिकलश दुपारी २ वाजता पंढरपुरात परिचारक यांचे निवासस्थानी आणण्यात येतील व सर्व अस्थीकलशांचे चंद्रभागेच्या नदीत विर्सजन होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)