ज्येष्ठ नेते सुधाकरपंत यांचे निधन राजकारणातील निस्पृह,संयमी नेतृत्व हरपले..

0


पंढरपूर : आमदार सुधाकरपंत यांच्या निधनाने संपुर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली. ते आजारी आहेत हे कळल्यावर अनेकांनी आपआपल्या परीने देवाजवळ प्रार्थना केल्या पण नियतीच्या पुढे कोणाचे चालत नाही या प्रमाणे सोमवारी रात्री 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. ही बातमी कळताच संपुर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आठ दिवसापुर्वी पुणे येथिल सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल कारण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्यावर सर्वोत्तम उपचार चालू होते. मधुमेह आणि रक्तदाब यासारखे आजार,वृद्धापकाळ आणि नव्याने उद्भवलेला कोव्हिड न्यूमोनिया यांमुळे त्यांची ही कोरोनाबरोबरची लढाई कठीण होत चालली होती आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालविली.


  सुधाकरपंतानी लोककल्याणाला महत्व दिले यामुळेच त्यांना लोक आदराने मोठे मालक या नावाने संबोधित करायचे. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे. त्यांना राजकारणातील संत , सहकारातील डॉक्टर या  नावाने ओळखले जाते. जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ ते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात व सहकारात काम करत होते. अखेरपर्यंत ते सक्रिय होते.सहकाराचा वापर त्यांनी जनतेच्या विकासासाठी केला व यामुळेच त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे व त्यांची भेट घेवून त्यांच्या पायावर डोके ठेवणार्‍यांची संख्या मोठी होती.मोठ्या मालकांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यातील राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली.


आशा या नेत्यास सा.पंढरी सत्यता परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)