परीक्षा झाली नाही तर परीक्षा शुल्क परत द्या- विशाल माने

0
परीक्षा झालेल्या नसताना ही शुल्क घेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन उभे करू. कारण विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला वारंवार परीक्षा शुल्क परत देण्यासंदर्भात निवेदने दिले आहेत. सोलापूर जिल्हा पाहिला तर ग्रामीण व शेतीवर अवलंबून असणारा हा जिल्ह्यात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. शेती,इतर उद्योग धंदे विस्कळीत झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. विद्यार्थी वर्ग,पालक आर्थिक संकटात सापडले आहेत तरी विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती चर्चा करून प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत द्यावी. अशी मागणी विद्यार्थी विशाल माने सह विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही अद्याप पर्यंत विद्यापीठाकडून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं  ठोस उत्तर मिळालं नाही. तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यां वर्गाचं मनन ऐकावे. विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा विशाल माने, सह विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)