पंढरपूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्यांनी 250 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या राम मंदिरामध्ये आज हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक आरती करण्यात आली.
अयोध्या मधील राम मंदिराचे भूमिपूजन झाले त्या निमित्ताने पंढरपुरात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पंढरपुरातील हिंदू आणि मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन होळकर वाड्यातील राम मंदिरात रामाच्या सोबतच विठुरायाची देखील आरती गायली. सदरची आरती अशपाक सय्यद , इब्राहिम बोहरी ,इक्बाल बागवान , समीर बेंद्रेकर , अकबर शेख , नागेश भोसले , दिलीप धोत्रे
ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे , आदित्य फत्तेपूरकर , शाम गोगांव , चंदूकाका दंडवते , गिरीष बोरखेडकर , माधव ताठे-देशमुख , विजय बंटी वाघ यांच्या हस्ते करण्यात आली.
आरती झाल्यानंतर सर्व उपस्थितानी "जय श्रीराम"असा एकच नारा दिला. त्यापासून सर्व मुस्लिम बांधवांचा होळकर संस्थाच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपुरकर यांनी सत्कार केला. प्रसंगी फिजीकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.



