रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरील नुकत्याच झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्येप्रकरणी सापडलेल्या सर्वच नराधमांना फाशीची शिक्षा द्या

0


रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवरील नुकत्याच झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्येप्रकरणी सापडलेल्या सर्वच नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी छावा क्षात्रवीर सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे निवेदन छावा क्षात्रवीर सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हाअधिकारी यांना देण्यात आले.

याबाबत अधिक तपास करून या खटल्या करिता विशेष सरकारी वकील नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक वर घेऊन नराधमांना फाशीच्या शिक्षेची निवेदनाद्वारे मागणी केली.

छावा क्षात्रवीर सेनेचे संस्थापक समाधान सुरवसे यांनी घडलेल्या कृत्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध केला.तांबडी येथील म्हांदलेकर कुटुंबीयांची सांत्वणपर दुरध्वनीद्वारे चर्चा करुन, सकल मराठा समाज छावा क्षात्रवीर सेना आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)