महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीतर्फेपत्रकारिता व सामाजिक कार्यातील पुरस्कार प्रदान

0
पंढरपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे समाजातील प्रतिष्ठित व लौकिक असणार्‍या व्यक्तिंना हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आयोजन राज्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते दिला जातो.  परंतु सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे सदर पुरस्कार ज्या त्या विभागात देण्याचे नियोजन केले होते. सदर कार्यक्रम पंढरपूरातील कैकाडी महाराज मठात घेण्यात आला.  
    या वर्षीचा आदर्श राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार अविनाश साळुंखे यांना कैकाडी महाराज यांचे पुतणे ह.भ.प. रामदास महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल सा. सत्यताचे  संपादक श्री. दत्ताजीराव पाटील यांना ह.भ.प. रामदास महाराज कैकाडी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमात सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे यांच्या हस्ते ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास पत्रकार ज्योतिषाचार्य राधेश बादले पाटील, सुरक्षा समिती अध्यक्ष रामभाऊ सरवदे , पत्रकार यशवंत कुंभार , विजय कांबळे, बाहुबली जैन, अपराजीत सर्वगोड, सुदर्शन खंदारे, राजेश काळे व अनेक मान्यवर पत्रकार या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)