विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात असे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने यु.जी.सीने म्हटले असले तरी या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असून तसे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उद्यन सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांना पाठवले आहे.राज्यासह देशात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश असून या परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य नाही.विद्यापीठ त्या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्यदृष्टीने परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तसेच त्याची माहिती आयोग सर्व विद्यापीठांनी शीर्ष संस्थांना करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले होते.मात्र केंद्रसरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने युजीसीनेही परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी विशाल माने तसेच विविध विद्यार्थी संघटना करत आहेत.केंद्रीय गृहमंत्र्यांनी परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांचे कोरोना काळात आरोग्य हित लक्षात घेत परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विशाल माने यांनी केले आहे.विद्यार्थी व पालकांचा विचार करून विद्यापीठाने व शासनाने परीक्षा रद्द कराव्यात सध्या जगभरामध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले असून शहरातच नव्हे तर विविध ग्रामीण भागांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना दिसत आहे तरी यूजीसीने विद्यार्थ्यांचा व त्यांच्या संरक्षणाचा विचार करता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी मी करत आहे. सध्या विद्यार्थी चिंतेत आहेतच परंतु पालकही या महामार्गामुळे परीक्षा कशी द्यावी याबाबत चिंतेत आहेत तरी विद्यापीठाने व शासनाने मी एक प्रतिनिधी म्हणून केलेली मागणी व विनंतीस दाद देऊन परीक्षा रद्द कराव्यात.

