प्रदिक्षणा मार्गावर एक व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह खबरदारी म्हणून प्रशासना कडून परिसर सील

0

पंढरपूर : पंढरपूरातील ऐन आषाढी वारीतील अनेक मठपती, व्यापारी, नगराध्यक्षा यांनी पंढरपूरातील नागरिकांना त्रास होऊ नये ही भुमिका घेतली आहे. हा विषय अनेक दिवसापासून सुरू आहे.आतापर्यत पंढरपूर कोरोना मुक्त आहे. प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन पंढरपूर शहर कोरोना मुक्त ठेवले आहे. 
     पंढरपुरात सध्या प्रदिक्षणा मार्गावर एक व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरा पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील व्यक्ति पॉझिटिव्ह आहे. काही दिवसापुर्वी शहर व ग्रामीण मधील 47 नागरिकांचे स्वँब चाचणी घेण्यात आली होती, त्यापैकी 39 जणाचे कोरोना रिपोर्ट आले होते त्यात एक करकंब व दुसरा पंढरपूरातील आहे. राहिलेले आठ जणाचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे डॉ.बोधले यांनी सांगितले आहे. पंढरपूरातील कोरोना व्यकित एका खाजगी सहकारी बँकेचा संचालक व एका मोठ्या प्रशालेत शिक्षक आहे. सदर व्यक्तिची तपासणी चार दिवसापुर्वी झाली होती. सदर व्यक्ति अनेकांच्या संपर्कात असल्याचे आढळून येत आहे. सदर पॉझिटीव्ह व्यक्तिमुळे पंढरपूरातील नागरिक भयभीत झाले आहेत. यांचे पडसाद संपुर्ण शहरात उमटले आहेत. त्यामुळे  ऐन आषाढी वारीच्या तोंडावर अशी घटना घडल्यामुळे नागरिकात चर्चेला उधाण आले आहे. सदर व्यक्तीचे नेहमी सोलापूरला जाणे येणे असल्यामुळे व जनसंपर्क असल्यामुळे नागरिकातून भितीयुक्त चर्चा होऊ लागली आहे.  नागरिक चक्रावून गेले आहेत. सदर व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क या लोकांचे आज क्वारंटाईन करून टेस्ट चाचणी केली जाणार आहे. सदर संपुर्ण विभाग हा नगरपालिकेतर्फे निजुर्तीकरण करण्यात आला आहे. सदर ठिकाणी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सागर कवडे साहेब,डॉ.एकनाथ बोधले यांनी भेट दिली. काळा मारूती चौकापासून छत्रपती संभाजीराजे चौक हा सिल करण्यात आला आहे  
आषाढी यात्रेत शासकीय महापुजा मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते होत असते.यावेळी फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे हे वारकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून पंढरपूरात येऊन विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पुजा करणार आहेत. यावेळी ते  जग कोरोनामुक्त व्हावे हे साकडे भगंवताकडे करणार आहेत. आषाढी यात्रेची परंपरा जपण्यासाठी आपण सर्व सोपस्कार पार पाडणार आहे. तसेच सर्व वारकर्‍यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला कुठलीही चिंता नाही असे ते म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)