संपुर्ण जिल्हा हळहळला.....आमचा देव गेला हीच भावना !

0

पंढरपूर : सुधाकरपंत यांचे पुणे येथे निधन झाले मुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे अस्थिकलश पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात ठेवले होते. नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. सर्वसामान्यांच्या या नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  जनतेच्या सर्वांगिन विकास व कल्याणासाठी अर्पण केले अशा संत स्वरूप नेत्यासाठी अख्खा सोलापूर जिल्हा गहिवरला.         
      जात-पात-धर्म या गोष्टीला कुठे थारा मिळाला नाही प्रत्येक नागरिक हळहळला, त्यांचे कंठ दाटून आले.सुधाकरपंत यांच्या अस्थिकलशाचे दर्शन पंढरपूर तालुक्यातील जनतेने व पंढरपुरातील नागरिकांनी घेतले.सर्व नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन व्हावे म्हणून नियोजन केले होते. प्रत्येक गावात या अस्थिकलशाचे नागरिकांनी दर्शन घेतले. चंद्रभागेत अस्थिचे विसर्जन  करण्याआधी अस्थि कलश विठ्ठल मंदिरास उजवी प्रदक्षिणा घालून, मंदिराजवळ आरती करुन नंतर चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले.

          सर्वांचे तारणहार कर्मयोगी सुधाकरपंत पांडुरंग स्वरुपात लिन झाले.यावेळेस सर्वच क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी आपल्या नेत्यास भावपूर्ण निरोप दिला. यावेळी जिल्हा प्रशासन यांचे वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी श्रद्धांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)