पंढरपूर : पंढरपूर येथे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या ६ व्या पुण्यतिथी निमित्त मा.श्री. आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र
अभिवादन केले.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य कुटुंबातून येवुन मोठी झेप घेतलेले लोकनेते व कष्टकरी जनतेचे आधारवड, महाराष्ट्राच्या
राजकारणातले एक महत्वाचे राजकीय नेते होते. भारतीय जनता पार्टीमधील भुमिगत स्तरावर काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे घराने राजकीय नसल्याने त्यांना
राजकारणाचा कोणताही राजकीय वारसा नव्हता. संघर्ष करीत ते सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते देशाचे केंद्रीय कृषी मंत्री पदापर्यंत वाटचाल केली. लोकसंपर्क, अन्यायाविरूध्द संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकुणच जे नवे चांगले ते हवे असा उत्साह असलेल्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाला जनमानसात स्थान मिळवुन दिले आणि विशेषत: उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश
आणि जिवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला. अशा या लोकनेत्यास विनम्र
अभिवादन... !
यावेळी दत्ता धोत्रे, सचिन लादे, दशरथ काळे, बादलसिंह ठाकुर, नितीन कारंडे, संजयपालकर, भिमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

