पंढरपूर : ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा राज्याभिषेक सोहळा ह्या निमित्ताने एन.एम मंच आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धे मागचा उद्देश आजच्या युवा पिढीला महापुरुषांचे विचार समजावेत, इतिहास माहीत होवा,वाचण्यात यावा तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी. म्हणून एन.एम मंच हा उपक्रम राबवत आहे. स्पर्धेचे विषय छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले तसेच आपल्या जिल्ह्याविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. वरील प्रत्येक विषयावर प्रश्न असणार आहेत. तरी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे आयोजक विशाल नामदेव माने यांनी केले आहे.स्पर्धेचा कालावधी २ जून ते १२ जून २०२० आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वयाची अट नाही. एन.एम मंच कडुन नियमित सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत येतात.ह्या अगोदर युवा लेखन स्पर्धा, युवा चित्रकला स्पर्धा, स्पर्धेमधून कलाकारांना आपले कला गुणांचे प्रदर्शन, सादरीकरण करण्यास संधी मिळते.

