पंढरपूर (प्रतिनिधी) सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या, छावा क्षात्रवीर सेनेच्या राज्यस्तरीय निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. पुणे जिल्हा प्रमुख पदी युवराज जेधे यांची निवड जाहीर करण्यात आली.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, समाधान सुरवसे यांनी या निवडी झाल्याचे घोषित केले. छावा क्षात्रवीर सेनेच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या संघटनेच्या झालेल्या एका बैठकीत अध्यक्ष समाधान सुरवसे,मार्गदर्शन खाली प्रदेश उपाध्यक्ष संदीप नवघणे.प्रदेश प्रवक्ते अरबाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत या
निवडी जाहीर करण्यात आल्या.
युवराज यशवंतराव जेधे सरदार कान्होजी जेधे यांचे थेट वशंज यांची पुणे जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील छावा क्षात्रवीर सेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना छावा क्षात्रवीर सेनेच्या समाजसेवेच्या वारशाचे स्मरण करून देण्यात आले. गाव तिथे शाखा, शाखा तिथे समाजसेवा, हे ब्रीद घेऊन जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा वसा समजावून देण्यात आला.

