पंढरपूर- कोरोना विषाणुमुळे महामारीचे संकट मानवावर आलेले आहे. ते संकट निवारण्यासाठी राज्यातील १००० वैदिक व पुरोहितांनी महामृत्युंजय जप सुरु केला आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट असून हा जप अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे वतीने करावयास पाहिजे होता, मी स्वतः बडवे विठ्ठल उपासक मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना केलेली आहे. तसे जाहीर पत्रकारांनाही कळविले आहे. परंतू मला वैदिक पुरोहीताचे नेतृत्व करणार्या वेदमुर्ती विश्वेश्वर घैसास गुरुजी यांना व पुरोहीत महासंघाना आठवण करुन द्यावयाची आहे
की हा जप ब्राह्मण महासंघातर्फे करावयास पाहिजे होता. भुगांव पुणे येथे वेदमुर्ती घैसास गुरुजी यांनी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे नेतृत्व केले आहे. व ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण अधिवेशने होतात त्या ठिकाणी घैसास गुरुजी यांनी ब्राह्माण समाजास जागृती करण्याचे काम केले आहे. त्याच प्रमाणे ब्राह्मण महासंघाने वैदिक पुरोहीताना मासिक वेतन ५०००/- रुपये द्यावे म्हणून पंढरपूर ब्राह्मण समाजातर्फे भागवताचार्य श्री वा.ना.उत्पात यांचे नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला व तत्कालीन सरकारला निवेदन दिले. अशा ब्राह्मण
महासंघाचा व ब्राह्मण समाजाचा कोरोना संकट निवारणार्थ केलेल्या अनुष्ठानाचे वेळेला विसर पडला म्हणून आम्हास खेद व्यक्त करावा लागत आहे. वैदिक पुरोहीत गुरुजनांबाबत आम्हाला नितांत श्रध्दा व आदर आहे. म्हणून आम्हास या गोष्टीचा निषेध करता येत नाही. गुरुवर्य घैसास गुरुजी यांनी ब्राह्मण समाजात जागृती केली आहे. ब्राह्मणावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठविला आहे. आज ब्राह्मण समाजाबद्दल देशामध्ये असंतोषाचे वातावरण असताना
त्यांनी फक्त वैदिक पुरोहीतांचे वतीने न करता ब्राह्मण समाजातर्फे कोरोना निवारणार्थ अनुष्ठान करावयास पाहिजे होते. तरी वैदिक पुरोहीतांच्या संघटने बाबत नाराजी व्यक्त करीत आहे अशी माहिती दत्तात्रय बाळासो बडवे,
माजी अध्यक्ष पंढरपूर शहर कण्व संघ पंढरपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

