पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद पंढरपुर अंतर्गत दिनदयाळ अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या योजनेमधुन CPWD गोपाळपुर रोड येथे शहरामधील निराश्रित लोंकासाठी माऊली बेघर निवारा सुरू केलेला आहे सदर निवा-या मध्ये असणा-या लाभार्थीसाठी कॉट,गादी,बेडशीट,चादरी व स्वच्छतागृह उपलब्ध करून देणेत आलेले आहे.
निवार्यातील लाभार्थीना वेळेवर चहा,नाष्टा व दोन वेळचे जेवन देणेत येत आहे दि २२-०३-२०२०पासुन कोव्हिड १९ या साथरोगामुळे लॉकडॉऊन मध्ये जवळपास १७७ लोक सदर ठिकाणी वास्तव करित होते. त्या कालावधी मध्ये माऊली बेघर निवारा मध्ये दि २२-०३-२०२० ते आज पर्यत श्री विठ्ठल रूक्मिनी मंदिर समिती व इस्कॉन मंदिर यांनी सकाळी नाष्टा आणि कोळी महासंघ उपाध्याक्ष अरूणभाऊ कोळी यांनी रोज संध्याकाळी एक वेळचे जेवन सर्व लोंकाना पुरवित आहेत तसेच मा नगराध्याक्ष सौ साधनताई भोसले, महावीर जयंती निमित्त शहरातीमधील जैन बांधव, पंढरपुर शहर डॉक्टर्स असोसिएशन, माणुसकी समाजसेवा संस्था,राष्टीय स्वंयसेवक संघ, साईबाबा संस्था, महेश तेंडुलकर, रोटरी क्लब पंढरपुर, संजय शांतीलाल शहा, कोस्तुभ ट्रेडिंग ,कंपनी, सुभाष मर्दा, दिपक चंदनशिवे, शिवाजी कोरे पोलिस निरिक्षक पंढरपूर, डॉक्टर श्रीकांत खटावकर, व संजिव खपाले, शाम पवार, बागवान मुहल्ला, न्यु बागवान मुहल्ला,अमित गायकवाड कृष्णा चौंडी,योगेश डोंगरे,शिवाजी कोळी,सुजितकुमार सर्वगोड,विठाई बहुऊद्देशिय संस्था इब्राहिम बोहरी,अश्विनी महाराज मनमाडकर, यांचे मार्फत गहु तांदुळ व किराणा साहित्य,भाजीपाला व फळे देणेत आले आहे
वरिल सर्व मान्यवर व्यक्तिनी केलेल्या सहकार्याबद्दल मा नगराध्याक्षा सौ साधनाताई भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे मार्फत आभार व्यक्त करणेत येत आहे.

