ऑरेंज झोनमधील बसेस ला परवानगी नाही
मे ०३, २०२०
0
महाराष्ट्र : केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्टीकरण दिले की 4 मे नंतर कुठे व काय-काय बंद केले जाईल आणि लॉकडाऊनमध्ये काय खुले होईल. ऑरेंज झोनमधील बसेस पूर्णपणे बंद ठेवल्या जातील. जिल्ह्यामध्ये व दोन जिल्ह्यांच्या दरम्यान देखील बसेस चालविल्या जाणार नाहीत. परंतु ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये न्हावीचे दुकान, सलून सुरू करण्याबरोबरच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनावश्यक वस्तूंच्या विक्रीसही मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेड झोनमध्येही काही अटींसह दारू आणि तंबाखूची दुकाने उघडली जातील. दरम्यान गृह मंत्रालयाने शुक्रवारी लॉकडाऊन दोन आठवड्यांपर्यंत वाढवून 17 मे पर्यंत केले आहे.

