पंढरपूर : आज संपूर्ण जग कोरोना या महाभयंकर विषाणू मुळे भीती च्या सावटा खाली चालत आहे.सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोना चा शिरकाव होऊ नये या साठी आज प्रत्येकजण आपापल्या परीने समाजातील गरजूंसाठी मदत करत आहेत.
धाराशिव साखर कारखाना युनिट चे 1 2 3 चे चेअरमन मा श्री.अभिजित पाटील यांनी डी. व्हि. पी. उदयोग समूह तर्फे सामाजिक बांधिलकी जपत आज पासून पिराची कुरोली घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंग टेस्टिंग ची तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली .पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन थर्मल स्क्रिनींग टेस्ट केली जाणार आहे तरी सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे

