सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११४ वर ...

0
सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या व शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान २ मे रोजी पुन्हा अशोक चौक परिसरातील पोलीस मुख्यालयात दोन व आकाशवाणी रोड परिसरातील गवळी वस्ती येथे एक असे तीन नवीन कोरोना बाधित रुग्ण आज वाढले आहेत.
       सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११४ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.कोरोनाच्या विळख्यात यापूर्वी डॉक्टर, नर्स व सोलापुरातील नगरसेवक आले आहेत. आता पोलिसही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ग्रामीण पोलीस मधील दोन जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर येत आहे. सोलापुरातील एकूण ११४ कोरोनाबाधित रुग्णापैकी ६ जणांचा मृत्यू झाला असून दहा जणांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरित ९८ जणांवर सोलापुरातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)